Wednesday, July 18, 2012

किती छान असतं ना ?

किती छान असतं ना ?
आपण कुणालातरी आवडणं..
कुणीतरी तासनतास आपलाच विचार करणं..
खरच!! किती छान असतं ना,
आपण कुणालातरी आवडणं..



कुणाच्यातरी पर्सनल डायरित आपलं नाव असणं,
चार-चौघात कुणीतरी सतत आपलाच उल्लेख करणं,
किती छान असतं ना..?
आपण कुणालातरी आवडणं..



कुणीतरी आपलं हसणं काळजात साठवनं,
कुणालातरी आपला अश्रू मोत्यासमान वाटणं..
खरच!! किती छान असतं ना..
आपण कुणालातरी आवडणं..



कुणीतरी आपल्या फोनची तासनतास वाट पाहणं,
देवसमोरही स्वताआधी आपलं सुख मागणं,
किती छान असतं ना..
आपण कुणालातरी आवडणं..



कुणीतरी डोळ्यात जीव आणून आपली वाट पाहणं,
आपल्या उपवासा दिवशी त्यानं ही हटकून उपाशी राहणं,
किती छान असतं ना..?
आपण कुणालातरी आवडणं..

कुणीतरी आपला विचार करत
पापनीवर पापनी अलगत टेकवनं,
झोपल्यावर मात्र स्वप्नातही आपल्यालाच पाहणं,
खरच, खूप छान असतं ना..

आपणही.. कुणालातरी आवडणं.......!

Friday, June 8, 2012

आयुष्य जास्त सुंदर वाटत..

चार - चौघात एकट बसण्यापेक्षा
कधी-कधी समुद्रकिनार्‍यावर
आठवणींना घेऊन बसावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत..

आपल्याला कोण हवंय
यापेक्षा आपण कोणाला हवंय
हेसुद्धा कधीतरी पहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत..

आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत
माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत
शक्य तेवढे तारे मोजून समाधानी रहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत....

Monday, April 2, 2012

मीच असेल..!

आठवण माझी कधीतरी येईलच तुला
तु कदाचीत रडशीलही
हात तुझे जुळवुन ठेव तु
सगळी आसवं तुझी त्यात सामावतील
जो थांबला तुझ्या हातावर
नीट बघ त्याच्याकडे
एकटाच राहीलेला तो थेंब मीच असेल..!

माझ्या आठवणी एखदयाला
सांगताना तु कदाचीत हसशीलही
जो थांबेल तुझ्या ओठावर येता-येता
नीट वापर त्याला
अडखळलेला तो शब्द मीच असेल..!

कधी जर पाहशील पोर्णीमेच्या तु चंद्राला
त्याच्या तेजाला तु निखरत राहशील
मध्येच गर्द काळ्या ढगांनी जर त्याला घेरलं
नीट बघ त्याच्याकडे घेरलेला तो ढग मीच असेल..!

कधी जर सुटला बेधुंद गार वारा
मोहक डोळे तुझे मिटुन तु घेशील
मध्येच स्पर्शली तुला जर उबदार प्रेमळ झुळुक
नीट बघ जाणवुन ती झुळुकही मीच असेल..!

Wednesday, September 21, 2011

लहानपण दे देवा

आईची अंगाई, काऊ-चिऊ चा घास हवा
मोठे नाही व्हायचे, मला लहानपण दे देवा

casual / sick लीव्ह नको, मला उन्हाळ्याची सुट्टी हवी
performance presentation, नको मला तोंडी परीक्षा हवी

chinese / thai नको, मला मऊ भात हवा
मोठे नाही व्हायचे, मला लहानपण दे देवा

मोठा flat नको, मला रेतीत किल्ला बांधायचा आहे
मोटर गाड़ी नको, मला तीन चाकी सायकल हवी आहे

कोट टाय नको, मला हाफ शर्ट हवा
मोठे नाही व्हायचे, मला लहानपण दे देवा

club / pub नाही, मला बागेत जायचे आहे
बग्गीजम्पिंग नाही, मला घसरगुंडीवर खेलायचे आहे

pepsi / sprite नको, मला बर्फाचा गोळा हवा
मोठे नाही व्हायचे, मला लहानपण दे देवा

रोज संध्याकाळी, मी शुभंकरोती म्हणीन 
आई बाबांना नमस्कार करून, पाढे  सुद्धा लिहिन
शाहन्या मुला सारखे, मोठ्यांचे ऐकिन

तुझ्या कडून मला, फक्त एक आशीर्वाद हवा
मोठे नाही व्हायचे, मला लहानपण दे देवा ....

Tuesday, January 11, 2011

मन असं का वागतं…

मन असं का वागतं…
कधी मस्तं विहारतं…
कधी गुपचुप कोपर्‍यात रुसुन बसतं…

कधी छोट्याश्या गोष्टीनेही खुप आनंदतं…
कधी मोठ्या दुखा:तही स्थिर असतं…

कधी आनंदाच्या सरींची बरसात करतं…
कधी व्यथेच्या सागरातही आनंदानं एकटंच डुलतं…

कधी हवं ते मिळावं म्हणुन धडपडतं…
कधी मिळवता न आल्यामुळे उगाच झुरतं…

कधी आठवणींसोबत भविष्याचं चित्र रंगवतं
कधी काही आठणीं संगे हिरमुसतं…

कधी मन उधाणलेली लाट…
कधी मन अनोळखी भविष्याकडे नेणारीसुंदर वाट…

एक कोडं अगदी गहीरं गहीरं…
सारं काही कळुनही कधीच न सुटणारं…

असं कसं मन आपलं आपल्यालाच समजेना…
मन नेमकं काय आहे कही केल्या उमजेना…

Thursday, September 30, 2010

काही चारोळ्या-२

लोक म्हणतात की डोळ्यात तिचिया ओलावा आहे
त्याला जर उमगलेत तर अश्रु नाहीतर फक्त पाणी....

----------------------------------------------------------------

हल्ली त्याला काय होतं काही कळत नाही....
ती समोर असली की त्याला काही काही सुचत नाही....

----------------------------------------------------------------

ती बोलता बोलताच शांत होते....
पण त्याला कळते की तिला काय बोलायचे असते
कारण तेव्हां तिची नजरच तितकी बोलकी असते....!!

----------------------------------------------------------------

मनाचा हा अधांतरी प्रवास
सगळच आता सवयीचं झालय....
तरीही कही नवं आहे
जे माहित नाही म्हणुनचं हव आहे....
काही हव असणं
म्हणजेच आपलं जीवन आहे....!!
नाहीका....?

काही चारोळ्या-१ http://kshitijdhalgaonkar.blogspot.com/2009/06/blog-post_5833.html 

Monday, April 5, 2010

एक प्रेयसी असावी....!!

प्रेमाला प्रेम समजणारी एक प्रेयसी असावी
मी जसा आहे तसेच, माझ्यावर प्रेम करणारी असावी

चश्मेबद्दुर .. खुबसुरत नसली तरी,
चारचौघीत उठून दिसणारी असावी

ग़ालिबाची शेर -ए-गझल नसली तरी,
माझी एक छानशी चारोळी असावी

यश-राज पिक्चरची हिरॉईन नसली तरी,
पण घराला घरपण देणारी नाईका असावी

बागेतल्या फुलांसारखी सुंदर नसली तरी,
पण अंगणातल्या तुळशीसारखी असावी

हाय... हेलो... नया दौर असला तरी
नव्या जुन्याची सांगड घालणारी असावी

ड्रीम-गर्ल नसे ना ...पण मनाने सुंदर असावी
नात्यांच्या नाजुक धाग्यांना हळुवार जपणारी असावी

ओळख असून सुद्धा अनोळखी वाटत राहावी
तिला ओळखण्याची दिनरात माझी धडपड चालावी

केव्हातरी कुठेतरी ती भरभरून व्यक्त होणारी असावी
मनाचे गुपित मग डोळ्यांनीच सांगणारी असावी

थोडी खट्टी...थोडी मिठी असावी
तिच्या लटक्या रुसण्या फुगण्यात मज्जा असावी

हसताना गालावर नाजुक खळी पडावी
त्या खळीत सदा पाडण्याची मग माझी रीतच व्हावी

इवल्याश्या नाकावर राग घेऊन वाट पाहणारी असावी
मी उशीर केला तर मग माझ्यात मिठीत रडणारी असावी

चोरून चोरून भेटायला येणारी असावी
हातात हात घालून मग सगळ्यांसमोर फिरणारी असावी

तिच्यासोबत आयुष्य ही एक वेगळीच बात असवी
सुख आणि दुःखात सदा दोघांची साथ असावी

जितकी प्रेमऴ तितकीच कठोर वागणारी असावी
माझ्या नकळत माझे आयुष्य फुलवणारी असावी

आयुष्याच्या अनेक वळणांवर साथीस असावी
भग्न स्वप्नांच्या वाटेवर नव्या स्वप्नांची ती उमेद असावी

प्रेमाला प्रेम समजणारी ती प्रेयसी असावी
मी जसा आहे तसेच, माझ्यावर प्रेम करणारी असावी

तेल आणि वात यांसारखी आमची जोडी असावी,
एकरूप होऊन जळताना इतरांना प्रकाश देणारी असावी!!